amravaticitynewslatestnewss breakingnews

दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढा!

अमरावती बसस्थानक परिसरात कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन; महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आक्रमक

अमरावती : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करून त्यांची आर्थिक देणी अदा करावीत, या मागणीसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

मागण्यांची अद्याप पूर्तता न झाल्याने ३ नोव्हेंबरपासून राज्यभरातील आगार आणि विभागीय स्तरावर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून अमरावती बसस्थानक परिसरात एसटी कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केले. घंटानादाच्या माध्यमातून शासन आणि महामंडळ प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला.

दिवाळीपूर्वी प्रलंबित आर्थिक प्रश्न मार्गी लावून कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी काळात राज्यव्यापी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासन आणि महामंडळ प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button