citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurPolice

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात रन फॉर युनिटी

सदर पोलीस ठाण्याच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

नागपूर | सिटी न्यूज

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त आज, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सदर पोलीस ठाण्याच्या वतीने एकता दौड अर्थात रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले.

सकाळी ६.४५ ते ७.४५ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात बिशप कॉटन शाळेतील सुमारे २५ ते ३० विद्यार्थी तसेच सदर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते.

रन फॉर युनिटीची सुरुवात सदर पोलीस ठाण्यापासून करण्यात आली. ही मॅरेथॉन जीएसटी ऑफिस, जपानी गार्डन चौक, रामगिरी टी पॉइंट आणि लुर्द माता मंदिर मार्गे पुन्हा जपानी गार्डन चौक, तिरपुडे कॉलेज परिसरातून सदर पोलीस ठाण्यात येऊन समाप्त झाली.

एकूण सुमारे २.५ ते ३ किलोमीटर अंतराची ही एकता दौड राबविण्यात आली. राष्ट्रीय एकात्मता, एकता आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सिटी न्यूज | नागपूर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button