citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

भंडारा रोडवरील घरफोडीचा छडा; दोन आरोपींसह विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

बंद घराचे कुलूप तोडून चोरी; 4 घरफोडींची कबुली, ₹4.57 लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : नागपूरच्या भंडारा रोड परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने छडा लावला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून, त्यांच्या चौकशीतून शहरातील आणखी तीन घरफोडींचे गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा रोडवरील एका बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि 8 हजार रुपये रोकड, सोन्या-चांदीचे दागिने तसेच मोबाईल असा एकूण 50 हजार 920 रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढला. त्यानंतर निलम फैय्याज अन्सारी, मयूर भुवनेश्वर नागदेवे आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी साथीदारांच्या मदतीने एकूण चार घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या अंगठ्या, लगड, मणी तसेच इतर दागिन्यांचा समावेश असून, एकूण 4 लाख 57 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे भंडारा रोडवरील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास पुढे गेला असून, आरोपींच्या चौकशीतून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी काही साथीदार सहभागी आहेत का, तसेच जप्त करण्यात आलेला मुद्देमाल कोणत्या-कुठल्या गुन्ह्यांशी संबंधित आहे, याचाही तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

या संपूर्ण कारवाईबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी अधिक माहिती दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button