AmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

अमरावतीत तलवार घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न; २९ वर्षीय तरुण ताब्यात

हिंदू स्मशानभूमी परिसरात राजापेठ पोलिसांची कारवाई; ३० इंची धारदार तलवार जप्त

अमरावती : अमरावती शहरात पुन्हा एकदा प्राणघातक शस्त्र घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रकार समोर आला आहे. हिंदू स्मशानभूमी परिसरात तलवार घेऊन फिरणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाला राजापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमकी काय आहे ही कारवाई, पाहूया…

२८ सप्टेंबर रोजी राजापेठ पोलीस ठाण्याचे पथक परिसरात पेट्रोलिंग करत होते. याचदरम्यान हिंदू स्मशानभूमी परिसरात एक तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात पाहणी केली. त्यावेळी एक इसम हातात शस्त्र घेऊन फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेत चौकशी केली.

चौकशीदरम्यान त्याचे नाव सचिन साहेबराव लोखंडे, वय २९ वर्षे, रा. मारोती नगर, ड्रीमपार्क, आकोली रोड, अमरावती असल्याचे समोर आले.

पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल ३० इंच लांबीची धारदार लोखंडी तलवार जप्त केली आहे. या तलवारीची अंदाजे किंमत २ हजार रुपये असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी आर्म्स अॅक्ट कलम ४/२५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. सार्वजनिक शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत.

अमरावतीत सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button