citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

AIIMSमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने १० लाखांची फसवणूक

NEET उत्तीर्ण मुलीच्या कुटुंबाला आरोपीने दिले प्रवेशाचे आमिष; कळमना पोलिसांत गुन्हा दाखल

नागपूर : NEET परीक्षा उत्तीर्ण झालेल्या १९ वर्षीय मुलीला AIIMS रुग्णालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपुरात समोर आला आहे. या प्रकरणी कळमना पोलिसांनी आशिष गोस्वामी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, दिनेश ठाकरे यांची १९ वर्षीय मुलगी NEET परीक्षा उत्तीर्ण झाली होती. मुलीला AIIMSमध्ये प्रवेश मिळवून देतो, असे सांगून आरोपी आशिष गोस्वामी याने ठाकरे कुटुंबीयांचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे.

यानंतर AIIMSमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून ठाकरे कुटुंबीयांकडून १० लाख रुपये घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

मात्र पैसे दिल्यानंतरही मुलीला AIIMSमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिनेश ठाकरे यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आशिष गोस्वामी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पैसे कशा पद्धतीने घेण्यात आले, बनावट कागदपत्रे नेमकी कोणती होती आणि या फसवणुकीत आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

वपोनी प्रवीण काले यांच्या मार्गदर्शनाखाली कळमना पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, AIIMS किंवा इतर प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावावर अशा प्रकारे आर्थिक फसवणूक होऊ शकते, त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकृत माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button