जळगाव जिल्हा हादरला; चाळीसगावात 13 वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार

आई कामासाठी गेलेल्या ठिकाणी सोबत असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मध्य प्रदेशातील दोन संशयितांना अटक
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील दोन संशयितांना तात्काळ अटक केली असून, संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या आईसोबत मदतीसाठी कामाच्या ठिकाणी गेली होती. याचदरम्यान आई पाणी भरण्यासाठी घरी गेल्याची संधी साधून संशयितांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत मध्य प्रदेशातील दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी BNS कलम 70(2) तसेच POCSO कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीवरील या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. पीडितेची ओळख कायद्यानुसार गोपनीय ठेवण्यात आली आहे.



