citynewsLatest NewsMaharashtraRaigad

महाड MIDC मध्ये कंपनीत भीषण स्फोट!

रिअॅक्टरची पाइप फुटल्यानंतर स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती; ४ किलोमीटरपर्यंत जाणवले हादरे

रायगड : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड MIDC परिसरात एका कंपनीत जोरदार स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. स्फोटानंतर कंपनीच्या परिसरात आग लागली आणि मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सिनर्जिया केम इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये रिअॅक्टरची पाइप फुटल्यानंतर हा भीषण स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, त्याचे हादरे कंपनीपासून सुमारे ४ किलोमीटर अंतरापर्यंत जाणवले असल्याची माहिती आहे.

स्फोटाचा मोठा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली. कंपनीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात धूर दिसून येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, स्फोट नेमका कशामुळे झाला, त्यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कामगार जखमी झाले आहेत का, तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

घटनेनंतर संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, स्फोटाचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

महाड MIDC मधील या घटनेमुळे औद्योगिक परिसराच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button