citynewsMaharashtraNagpur

प्रतापनगर चौकात गणपती उत्सवाचा मोठा बॅनर कोसळला; वाहनचालक थोडक्यात बचावला

गणपती उत्सवासाठी उभारलेल्या जाहिरातींच्या बॅनरच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; सुदैवाने जीवितहानी टळली

नागपूर | गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या प्रतापनगर चौकात उभारण्यात आलेला मोठा जाहिरातींचा बॅनर अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे बॅनर कोसळताना तो एका वाहनचालकाच्या अंगावर पडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नागपूरच्या प्रतापनगर चौकात गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेला मोठा जाहिरातींचा बॅनर अचानक कोसळला. या बॅनरवर विविध जाहिराती लावण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे परिसरात पाऊस किंवा वादळ नसतानाही हा बॅनर अचानक कोसळल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. बॅनर कोसळताना तो एका वाहनचालकाच्या अंगावर पडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, चौकातून वाहनांची वर्दळ सुरू असतानाच बॅनर कोसळल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.

या घटनेनंतर गणपती उत्सवाच्या काळात उभारण्यात येणाऱ्या मोठ्या जाहिरातींच्या बॅनरच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा बॅनरची उभारणी करण्यापूर्वी त्यांची संरचनात्मक सुरक्षितता तपासली जाते का? परवानगी देताना संबंधित विभागाकडून आवश्यक ती पाहणी केली जाते का? आणि धोकादायक संरचना आढळल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील मोठ्या जाहिरातींच्या बॅनरची तपासणी करून धोकादायक संरचना तातडीने हटवण्याची मागणी होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button