BuldhanacitynewsCrime News

जानेफळच्या SBI बँकेत शेतकऱ्याचे ३५ हजार रुपये लंपास

दिवसा बँकेच्या परिसरात चोरी; सीसीटीव्हीत प्रकार कैद, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील एसबीआय बँकेत शेतकऱ्याचे तब्बल ३५ हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. जानेफळ येथील शेतकरी दिगंबर जाधव हे आपल्या कष्टाची कमाई बँकेत जमा करण्यासाठी गेले होते. पैसे भरण्यासाठी विड्रॉल स्लिप घेण्यासाठी ते खिडकीजवळ गेले असता, त्यांनी ठेवलेली ३५ हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याची माहिती आहे.

दिवसाढवळ्या बँकेच्या परिसरातच ही चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे चोरीचा हा संपूर्ण प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती असून, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सिटी न्यूजच्या हाती आला आहे.

या प्रकरणी जानेफळ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. दरम्यान, बँक परिसरासह बसस्थानक आणि इतर प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button