citynewsLatest NewsMaharashtraNagpur

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मनपाचा पुढाकार; ४१९ विसर्जन कुंडांचे लोकार्पण, १८ निर्माल्य रथांना हिरवी झेंडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेने पर्यावरण संवर्धनासाठी विशेष तयारी केली आहे. गणरायाच्या विसर्जनामुळे नदी, तलाव आणि अन्य जलस्रोतांचे प्रदूषण होऊ नये, यासाठी शहरात तब्बल ४१९ कृत्रिम विसर्जन कुंडांची निर्मिती करण्यात आली आहे.

या कृत्रिम विसर्जन कुंडांचे फुटाळा तलाव परिसरात महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण करत नागरिकांना भक्तिभावाने गणेशमूर्तींचे विसर्जन करता यावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

याचवेळी गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर जमा होणारे निर्माल्य योग्य पद्धतीने संकलित करण्यासाठी १८ निर्माल्य रथांनाही महापौर निता ठाकरे यांनी हिरवी झेंडी दाखवली.

शहरातील विविध भागांत उपलब्ध करून देण्यात आलेल्या या कृत्रिम विसर्जन कुंडांमुळे नागरिकांना जलस्रोतांचे प्रदूषण टाळून पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाला निरोप देता येणार आहे. तसेच निर्माल्य रथांच्या माध्यमातून निर्माल्याचे स्वतंत्र संकलन आणि योग्य व्यवस्थापन करण्यासही मदत होणार आहे.

भक्तीचा उत्साह कायम ठेवत पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संदेश देणारा नागपूर महानगरपालिकेचा हा उपक्रम गणेशोत्सवाच्या काळात निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button