citynewsYavatmal

यवतमाळ जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या विकासकामांना मिळणार गती

जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी विकास मीना यांचे कडक निर्देश; निधी शंभर टक्के खर्च करण्याच्या सूचना

यवतमाळ जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या विकासकामांना आता गती मिळण्याची अपेक्षा आहे. महसूल भवन येथे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचना व निर्देशांवर झालेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

२३ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार, आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधींनी विविध विकासकामांबाबत सूचना केल्या होत्या. या सूचनांनुसार संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करून कामे पूर्ण करावीत आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, संबंधित विभागांनी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण कामांचे प्रस्तावही सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

दरम्यान, २०२६-२७ या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेचा निधी कालमर्यादेत शंभर टक्के खर्च करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही विभागाचा निधी अखर्चित राहून समर्पित होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांवर तातडीने कार्यवाही, प्रशासकीय मान्यतेच्या प्रक्रियेला वेग आणि उपलब्ध निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याच्या निर्देशांमुळे यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकासकामांना आगामी काळात गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button