AmravaticitynewsCrime News

राजापेठ पोलिसांचा आंतरजिल्हा दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश

तीन आरोपी अटकेत; १२ दुचाकींसह ४.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बस स्थानक परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकीच्या तपासादरम्यान राजापेठ पोलिसांनी आंतरजिल्हा दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांच्या १२ दुचाकी तसेच वाहनांचे सुटे भाग असा एकूण ४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राजापेठ बस स्थानक परिसरातून सचिन बाळकृष्ण वैद्य यांची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी चोरीला गेल्यानंतर राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना डीबी पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वसीम खान बब्बू खान, शेख इरफान उर्फ भुऱ्या शेख मन्सूर आणि सद्दाम अली फैयाज अली या तिघांना अटक केली.

पोलीस चौकशीत आरोपींकडून विविध कंपन्यांच्या तब्बल १२ दुचाकी तसेच इतर गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेल्या वाहनांचे सुटे भाग जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख ५८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईमुळे आंतरजिल्हा स्तरावर कार्यरत असलेल्या दुचाकी चोरीच्या टोळीचा पर्दाफाश झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच आरोपींकडून आणखी काही दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केली.

राजापेठ पोलिसांच्या या कारवाईमुळे दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश झाला असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आता या आरोपींकडून आणखी किती गुन्ह्यांची उकल होते, याकडे नागरिकांसह पोलिसांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button