AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

अमरावती महापालिकेच्या मालमत्ता कर वसुलीला जोरदार प्रतिसाद; एका दिवसात ₹३.२७ कोटींची वसुली!

प्रभाग समिती क्रमांक २ आघाडीवर; ₹१.०४ कोटींची सर्वाधिक वसुली, ३१ ऑगस्टपर्यंत शास्तीमध्ये १००% सूट

अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली मोहिमेला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. आजच्या लाईव्ह कलेक्शननुसार महानगरपालिकेने तब्बल ३ कोटी २७ लाख रुपयांची वसुली केली आहे. या वसुलीत प्रभाग समिती क्रमांक २ ने सर्वाधिक कामगिरी करत आघाडी घेतली आहे.

प्रभाग समितीनिहाय आकडेवारी पाहता, प्रभाग समिती क्रमांक १ कडून ६९ लाख ५४ हजार रुपये, प्रभाग समिती क्रमांक २ कडून १ कोटी ४ लाख रुपये, प्रभाग समिती क्रमांक ३ कडून ५० लाख १६ हजार रुपये, प्रभाग समिती क्रमांक ४ कडून ४७ लाख १७ हजार रुपये, तर प्रभाग समिती क्रमांक ५ कडून ५६ लाख ५४ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

यामध्ये प्रभाग समिती क्रमांक २ ने १ कोटी ४ लाख रुपयांची वसुली करत सर्वाधिक योगदान दिले आहे. त्यामुळे एका दिवसातील लाईव्ह कलेक्शनने तीन कोटींचा टप्पा ओलांडून ₹३.२७ कोटींवर मजल मारली आहे.

महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेले प्रयत्न तसेच नागरिकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे ही दमदार वसुली शक्य झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, नागरिकांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे ३१ ऑगस्टपर्यंत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये १०० टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे थकीत मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांसाठी ही मोठी संधी असून, या सवलतीचा लाभ घेऊन कराचा भरणा तातडीने करण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महापालिकेच्या कर विभागाने वसुलीचा हा वेग कायम ठेवून महानगरपालिकेच्या महसुलात आणखी भर घालण्याचा निर्धार केला आहे.

एकीकडे महापालिकेच्या तिजोरीत कोट्यवधींची भर पडत असताना, दुसरीकडे १०० टक्के शास्तीमाफीची अंतिम मुदतही जवळ आली आहे. त्यामुळे थकीत करदात्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button