BuldhanacitynewsLatest NewsMaharashtra

बुलढाण्यातील खंडाळा देवीत नवरात्रोत्सवाचा उत्साह! जय जगदंबा आणि रेणुका माता मंदिरात भाविकांची गर्दी

अष्टमीला रेणुका माता मंदिरात होम-हवन संपन्न; नवमीला जय जगदंबा मंदिरात धार्मिक विधी, देवीच्या दर्शनासाठी दूरदूरून भाविक दाखल

मेहकर, बुलढाणा | प्रतिनिधी गजानन राऊत

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात असलेल्या खंडाळा देवी येथे नवरात्रोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. गावातील प्राचीन जय जगदंबा माता मंदिर संस्थान आणि रेणुका माता मंदिर ही भाविकांची श्रद्धास्थाने असून, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दोन्ही मंदिरांमध्ये धार्मिक विधी पार पडत आहेत. सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविक मंदिरांमध्ये दाखल होत आहेत.

अष्टमीला रेणुका माता मंदिरात होम-हवन

नवरात्रोत्सवाच्या अष्टमीच्या दिवशी रेणुका माता मंदिरात विधिवत होम-हवन पार पडले. यावेळी गावातील पाच भोपे-पुजारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आई रेणुका मातेच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

नवमीला जय जगदंबा मंदिरात धार्मिक सोहळा

नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी प्राचीन जय जगदंबा माता मंदिरासमोर होम-हवनाचा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हे मंदिर जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावून येणारी देवी, अशी जय जगदंबा मातेची ख्याती परिसरात असल्याचे सांगितले जाते.

देवीच्या प्राचीन परंपरेची भाविकांमध्ये श्रद्धा

खंडाळा देवी येथील मंदिराची एक वेगळी आख्यायिका सांगितली जाते. देवी शेतातून अनवाणी जात असताना नांगरात अडकल्याची कथा स्थानिकांकडून सांगितली जाते. या परंपरेमुळे आणि देवीवरील श्रद्धेमुळे नवरात्रोत्सव तसेच यात्रेच्या काळात परिसरातील विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येतात.

देवीच्या जयघोषाने परिसर भक्तिमय

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने खंडाळा देवी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची वर्दळ सुरू असून, धार्मिक कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थही सहभागी होत आहेत.

या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांनी जय जगदंबा देवी संस्थान, खंडाळा देवी येथील प्रतिनिधींशी संवाद साधला. मंदिराची परंपरा, धार्मिक विधी आणि नवरात्रोत्सवाचे महत्त्व याविषयी त्यांनी काय माहिती दिली, पाहूया सविस्तर.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button