अमरावतीत चाकू घेऊन फिरणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला अटक!

नागपुरी गेट पोलिसांची धडक कारवाई; आरोपीकडून चायना चाकू जप्त, आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल
अमरावतीत पुन्हा एकदा पोलिसांची धडक कारवाई पाहायला मिळाली आहे. नागपुरी गेट पोलिस स्टेशनच्या हद्दीत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने धारदार चाकू घेऊन फिरणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाला डीबी पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चायना चाकू जप्त केला असून, त्याच्याविरोधात आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलिस स्टेशन परिसरात पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे.
उस्मान नगर परिसरात धारदार चाकू घेऊन एक तरुण फिरत असल्याची माहिती नागपुरी गेट पोलिसांच्या डीबी पथकाला गस्ती दरम्यान मिळाली होती.
माहिती मिळताच डीबी पथकाने तातडीने कारवाई करत संशयित तरुणाला ताब्यात घेतले.
शेख अरसलान अब्दुल माजिद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचे वय 19 वर्षे आहे. तो उस्मान नगर, अमरावती येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपीकडून पोलिसांनी धारदार चायना चाकू जप्त केला आहे.
परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोपी हा चाकू घेऊन फिरत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी नागपुरी गेट पोलिस स्टेशनमध्ये आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई अमरावती शहराचे पोलिस आयुक्त राकेश ओला, पोलिस उपायुक्त परिमंडळ एक यशवंत सोळंके आणि गाडगे नगर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कोटनाके, पोलिस निरीक्षक गुन्हे निशांत देशमुख, डीबी प्रभारी उपनिरीक्षक विकास मनपिया, उपनिरीक्षक दादू दहीकर तसेच डीबी पथकातील मलिक अहेमद, दिनेश नांदे, दानिश शेख, राहुल रोडे, सागर पंडित, विक्रम नशिबकर, कुणाल बरडे आणि संदीप उइके यांनी ही कारवाई केली.
अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून गस्त आणि कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या या तरुणावर आर्म्स अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास नागपुरी गेट पोलिस करत आहेत.



