BreakingNewscitynewsLatest NewsMaharashtraNewsNagpur

मनसर उड्डाणपुलावर मोपेडला अज्ञात वाहनाची धडक; 26 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

25 वर्षीय युवक गंभीर जखमी; अपघातानंतर अज्ञात वाहनचालक फरार, पोलिसांकडून शोध सुरू

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मनसर येथील उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने मोपेडला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने 26 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला 25 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर येथील उड्डाणपुलावर बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

आशीष सहानी, वय 26 वर्षे, आणि शेषमणी निषाद, वय 25 वर्षे, हे दोघेही मोपेड क्रमांक MH 40 AA 4325 वरून नागपूरहून सारखा बोरडा येथील आपल्या नानांच्या घरी जात होते.

दोघे मनसर येथील उड्डाणपुलावरून जात असताना त्यांच्या मोपेडला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, आशीष सहानी याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर शेषमणी निषाद हा गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह पोलीस कर्मचारी प्रवीण मर्सकोले, संजेश मडावी, प्रवीण मते आणि पोलीस पाटील विमलेश बेहाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमी शेषमणी निषाद याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, मृतक आशीष सहानी याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रामटेक शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, या अपघाताचा पुढील तपास रामटेक आणि मनसर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मनसर उड्डाणपुलावर झालेल्या या भीषण अपघातात एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. अपघातानंतर फरार झालेल्या अज्ञात वाहनचालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button