citynewsLatest NewsMaharashtraWardha

विजय वडेट्टीवार यांनी संयम पाळावा; खासदार अमर काळे यांचा सल्ला

शरद पवार यांच्यावरील टीकेचा केला निषेध; पक्षाची अधिकृत भूमिका ठरण्यापूर्वी वक्तव्य करणे अयोग्य असल्याचे मत

वर्धा : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर वर्धेचे खासदार अमर काळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा निषेध करताना त्यांनी पक्षाची अधिकृत भूमिका ठरलेली नसताना मोठ्या नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

खासदार अमर काळे म्हणाले की, एखादा निर्णय झाल्यानंतर तो चुकीचा वाटत असेल, तर त्यावर आपली भूमिका मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, पक्षाची भूमिका अद्याप निश्चित झालेली नसताना अशा प्रकारचे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे.

विजय वडेट्टीवार यांनी थोडा संयम पाळावा आणि सध्या मौन बाळगावे. निर्णय झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. निर्णय होण्यापूर्वीच अशा पद्धतीने वक्तव्य करणे त्यांना शोभणारे नाही, असे मत खासदार अमर काळे यांनी व्यक्त केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button