Amravati GramincitynewsDharniLatest NewsMaharashtraSocial News

धारणीत शहीदांच्या स्मृतींना अनोखी सलामी; १११ रक्तदात्यांचे महारक्तदान

स्वातंत्र्यदिनानिमित्त रंग भवन मैदानावर रक्तदान शिबिर; देशभक्तीसोबत मानवसेवेचा दिला संदेश

धारणी | प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनाच्या पावन पर्वावर धारणीमध्ये वीर शहीदांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहीदांच्या स्मृतींना समर्पित आयोजित महारक्तदान शिबिरात तब्बल १११ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. या उपक्रमातून देशभक्तीसोबत मानवसेवेचाही संदेश देण्यात आला.

रंग भवन मैदानावर महारक्तदान शिबिर

धारणी येथील रंग भवन मैदानावर राज्य उत्पादन शुल्क विभाग, अमरावती आणि धारणी मद्य विक्रेता संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला सहायक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला, नगरपंचायत मुख्याधिकारी अविनाश कुटे, नगरपंचायत अध्यक्ष सुनील चौथमल आणि गटनेते पंकज मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोलीस प्रशासनाचेही सहकार्य

शिबिराच्या आयोजनासाठी धारणीचे ठाणेदार अवतार सिंह चौहान, एपीआय संदीप पाटील यांच्यासह पोलीस प्रशासनाने सहकार्य केले.

रक्तदानासाठी आलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉ. जावरकर, डॉ. सुभाष जांबेकर आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने रक्तदात्यांची तपासणी करून रक्तसंकलनाची व्यवस्था केली.

युवक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

या महारक्तदान शिबिरात युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. एकूण १११ रक्तदात्यांनी रक्तदान करत गरजू रुग्णांसाठी मोलाचे योगदान दिले.

रक्तदानातून अनेक गरजू रुग्णांना मदत होऊ शकते. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरला.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी वीर शहीदांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, तर धारणीतील रक्तदात्यांनी रक्तदानातून मानवसेवेचा संदेश देत त्यांच्या बलिदानाला अनोखी सलामी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button