BhandaracitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

शेतकऱ्यांच्या केबल वायर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; लाखनी पोलिसांनी चौघांना केली अटक

सोलर व मोटार पंपांच्या केबल चोरी करणाऱ्या टोळीवर कारवाई; ₹१.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त

भंडारा | प्रतिनिधी

भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलिसांनी शेतकऱ्यांच्या सोलर आणि मोटार पंपांच्या केबल वायर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीचा तांबा, दोन मोटारसायकली आणि इतर साहित्य असा १ लाख २७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पिंपळगाव सडक परिसरातील शेतकऱ्यांच्या केबल वायर चोरीच्या तक्रारीनंतर लाखनी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. डीबी पथकाच्या मदतीने सापळा रचत संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी लाखनी, पालांदूर, अड्याळ, कारधा आणि लाखांदूर परिसरात सोलर तसेच मोटार पंपांच्या केबल वायर चोरी केल्याची कबुली दिली.

तपासादरम्यान चोरीतील तांबा खरेदी करणाऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली. या कारवाईत आरोपींकडून चोरीचा तांबा, दोन मोटारसायकली आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख २७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपासासाठी त्यांची पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. या टोळीने आणखी कुठे अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

शेतकऱ्यांच्या सोलर आणि मोटार पंपांच्या केबल वायर चोरीमुळे मोठे आर्थिक नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर लाखनी पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर प्रभावी आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button