ग्रामीण पत्रकार संघाच्या सांस्कृतिक मंचावर काशिनाथ विश्वकर्मा यांची सदस्यपदी नियुक्ती

सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल; संघटनेकडून अधिकृत ओळखपत्र प्रदान
प्रतिनिधी
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सांस्कृतिक मंचावर काशिनाथ रामसंजीवन विश्वकर्मा यांची सांस्कृतिक मंचाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
नियुक्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संघटनेच्या वतीने श्री. विश्वकर्मा यांना अधिकृत ओळखपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या नियुक्तीमुळे संघटनेच्या सांस्कृतिक उपक्रमांना अधिक बळ मिळेल, तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रभावी काम करण्यास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
श्री. काशिनाथ विश्वकर्मा यांच्या निवडीबद्दल अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच नव्या जबाबदारीत यशस्वी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या नियुक्तीमुळे ग्रामीण पत्रकार संघाच्या सांस्कृतिक मंचाच्या विविध उपक्रमांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



