citynewsIndia NewsLatest NewsMaharashtrapolitics

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; देशहित आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी घेतल्याचा दावा

‘राष्ट्रविरोधी शक्तींना संधी मिळू नये, विद्यार्थ्यांचे भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये’ – एक्सवरील पत्रातून भूमिका स्पष्ट; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही

नवी दिल्ली | प्रतिनिधी

देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. शनिवारी (२५ जुलै) त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर आपले राजीनामा पत्र प्रसिद्ध करत ही माहिती दिली.

राजीनामा पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी गेल्या दहा दिवसांतील घडामोडींविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. जंतर-मंतरसह देशभरातील परिस्थितीचा गैरफायदा राष्ट्रविरोधी शक्तींनी घेऊ नये, देशाची एकता अबाधित राहावी आणि विद्यार्थ्यांचे भविष्य कोणत्याही कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये, या उद्देशाने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रधान यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “देशाची एकता कायम राहावी, भारतातील कोणत्याही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये आणि आपल्या मुलांनी आंदोलनांऐवजी शिक्षण व करिअर घडविण्यावर लक्ष केंद्रित करावे, यासाठी मी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.”

धर्मेंद्र प्रधान यांच्या या निर्णयामुळे देशाच्या राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या राजीनाम्यामागील नेमकी पार्श्वभूमी आणि पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राजीनाम्यावर अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच पंतप्रधान कार्यालय किंवा केंद्र सरकारकडूनही याबाबत अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला जाणार का, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी पुढे कोणाकडे सोपवली जाणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button