citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपुरात भरदिवसा रक्तरंजित हल्ला! जरीपटका परिसर हादरला; महिलेची प्रकृती गंभीर

नागपूरच्या जरीपटका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. भरदिवसा, भररस्त्यात जुन्या वादातून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. साधवानी कुटुंबाने दामवानी कुटुंबावर लोखंडी रॉड, हातोडा आणि लाठ्या-काठ्यांनी अमानुष हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या हल्ल्यात एका महिलेच्या डोक्यावर गंभीर वार करण्यात आला असून त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर हल्ल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे हल्ल्यानंतरही मुख्य आरोपी फरार असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. अनेक तास उलटून गेले तरी जरीपटका पोलिसांकडून कोणतीही ठोस अटक करण्यात आली नसल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी दोन्ही बाजूंवर क्रॉस एफआयआर दाखल केल्याची माहिती दिली आहे. जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

जरीपटका परिसरातील या रक्तरंजित घटनेमुळे नागपूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भरदिवसा घडलेला हा हल्ला आणि त्यानंतरची पोलिसांची भूमिका यावर नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की पोलिस आरोपींना किती लवकर अटक करतात आणि या प्रकरणात पीडितांना न्याय कधी मिळतो.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button