citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूरच्या कोराडी प्रकल्पात भीषण दुर्घटना! बॉयलर बिघाडामुळे ८ कर्मचारी जखमी

नागपूरमधील कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात आज दुपारी एक गंभीर आणि धक्कादायक घटना घडली आहे. काम सुरू असतानाच अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे गरम राख आणि वाफ अंगावर उडाल्याने तब्बल ८ अधिकारी-कर्मचारी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महानिर्मितीच्या ६६० मेगावॅट क्षमतेच्या युनिट क्रमांक १० मध्ये राख काढण्याचं काम सुरू होतं. याच वेळी बॉयलरमध्ये अचानक बिघाड झाला आणि बॉयलरमधील छिद्रातून प्रचंड वेगाने गरम राख व वाफ बाहेर पडली. काही क्षणांतच ही राख कामगारांच्या अंगावर उडाली आणि परिसरात एकच गोंधळ उडाला.

या दुर्घटनेत ८ जण भाजले गेले असून त्यांना तातडीने मानकापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

👉 विशेष बाब म्हणजे, कोराडी प्रकल्पात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सध्या या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असून, नेमका बिघाड कशामुळे झाला याचा तपास केला जात आहे.

👉 सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष होत आहे का? आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कोणती ठोस पावलं उचलली जाणार?

या प्रकरणातील पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button