citynewsInternational NewsLatest News
इराकमधील एरबिलमध्ये ब्रिटिश ऑइल प्लांटवर ड्रोन हल्ला; भीषण आग, मध्यपूर्वेतील तणाव वाढला

एरबिल (इराक) – मध्यपूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराकमधील कुर्दिस्तान प्रदेशाची राजधानी एरबिल येथे मोठा हल्ला घडला आहे. कॅस्ट्रोलच्या ऑइल प्लांटवर ड्रोन हल्ला झाल्यानंतर तेथे भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये प्लांटमधून निघणारा काळा धूर आणि आगीच्या उंच ज्वाळा स्पष्टपणे दिसत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यात प्लांटचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा इराण आणि युनायटेड किंगडम यांच्यातील तणाव वाढत आहे. अलीकडेच इराणच्या ब्रिटनमधील राजदूताने ब्रिटिश लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला होता.
या घटनेमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



