AmravatiCrime NewsLatest News

अमरावतीत ड्रग्सविरोधात मोठी कारवाई, 1 किलो 220 ग्रॅम गांजा जप्त

अमरावती शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने ZERO TOLERANCE POLICY अंतर्गत ही कारवाई केली. २० मार्च २०२६ रोजी गुन्हे शाखा पथकाला गुप्त माहिती मिळाली की शहरात अंमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि दोन आरोपींना ताब्यात घेतलं.

या आरोपींकडून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली — हा संपूर्ण रॅकेट राजस्थान ते मुंबई आणि पुढे अमरावतीपर्यंत पसरलेला होता. मुख्य आरोपी राजस्थानमधून अंमली पदार्थ आणून अमरावतीत विक्री करत असल्याचं उघड झालं, यानंतर पोलिसांनी राजस्थानपर्यंत तपासाची व्याप्ती वाढवली आणि तिथूनही मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला.

या संपूर्ण कारवाईत एकूण १ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे ३ लाख ३८ हजार रुपये असल्याची माहिती आहे. तसेच आरोपींविरोधात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. अमरावती पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थांविरोधातील मोठं पाऊल मानलं जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button