Accident NewsLatest NewsNanded

नांदेडमध्ये दुचाकीला भीषण आग! 90% भाजला युवक

नांदेड शहरातील वाजेगाव बंधारा ब्रिजवर एका दुचाकीने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत एक व्यक्ती तब्बल 90 टक्के भाजल्याची माहिती असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना अपघात आहे की यामागे काही वेगळं कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

नांदेड शहरातील वाजेगाव बंधारा ब्रिज जिथे अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं, मिळालेल्या माहितीनुसार एका दुचाकीने अचानक पेट घेतला…आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केलं, या आगीत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून तो तब्बल 90 टक्के भाजला असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आणि यावरून विविध चर्चांना उधाण आलं आहे, ही घटना नेमकी अपघात आहे, की यामागे काही वेगळं कारण आहे. याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button