AmravatiCrime NewsLatest News

अमरावतीत मोठी ड्रग्स कारवाई, 76 ग्रॅम MD जप्त

अमरावतीत एमडी ड्रग्सविरोधात पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे. मुंबईहून अमरावतीत अंमली पदार्थ विक्रीसाठी येणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ११ लाख ४० हजार रुपयांचा एमडी ड्रग्स जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई अमरावती शहरात करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहर गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की मुंबईहून एक व्यक्ती एमडी म्हणजेच मॅफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी अमरावतीत येत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील नवी वस्ती येथील सर्किट हाऊस परिसरात सापळा रचला. कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले. पहिला आरोपी आहे मोहम्मद रफीक मोहम्मद सलीम, वय ४२ वर्ष, रा. अंधेरी वेस्ट, मुंबई. हा आरोपी मुंबईहून अमरावती शहरात एमडी विक्री करण्यासाठी आला होता. दुसरा आरोपी आहे सोहेल खान फिरोज खान, वय २६ वर्ष, रा. छाया नगर, अमरावती. पोलिसांनी या दोघांकडून एकूण ७६ ग्रॅम एमडी (मॅफेड्रोन) हा अंमली पदार्थ जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत ११ लाख ४० हजार रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे. अमरावती शहरात अंमली पदार्थांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी “एमडी मुक्त अमरावती” हा संकल्प हाती घेतला असून अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button