citynewsCrime NewsEducation NewsLatest NewsMaharashtraYavatmal

यवतमाळ जिल्ह्यात निलगायीची निर्घृण शिकार; पोखरी घाट परिसरात खळबळ

यवतमाळ जिल्ह्यातील Kali (Dau) वनपरिक्षेत्रात पुन्हा एकदा वन्यजीव शिकारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. Pokhari Ghat परिसरात निलगायीची निर्घृण शिकार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात शिकाऱ्यांनी सापळा लावून Nilgai पकडली आणि धारदार शस्त्रांनी तिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी स्थानिक नागरिकांना पोखरी शिवारातील घाट परिसरात निलगायीचा मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आला.

मृतदेहाची पाहणी केली असता शिकाऱ्यांनी निलगायीचे पाय, पोटातील अवयव आणि मोठ्या प्रमाणात मांस कापून नेल्याचे दिसून आले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणाबाबत काळी (दौ.) वनपरिक्षेत्राचे रेंजर सम्राट मेश्राम यांना विचारणा केली असता त्यांनी या घटनेबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

दरम्यान, याच परिसरात एप्रिल २०२४ मध्येही तीन निलगायींची शिकार झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी Local Crime Branch Maharashtra Police ने कारवाई करत सात आरोपींना अटक केली होती. पुन्हा एकदा घडलेल्या या घटनेमुळे वन्यजीव संरक्षणाबाबत वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button