Latest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

सावनेरजवळ नंदाजी बाबा मंदिर परिसरातील डोहात अनोळखी इसमाचा मृतदेह; परिसरात खळबळ

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. हेटी गावातील नंदाजी बाबा मंदिर परिसरातील डोहामध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हेटी गावातील नंदाजी बाबा मंदिराजवळील डोहामध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. ही बाब सर्वप्रथम स्थानिक नागरिक शुभम डवरे यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना याची माहिती दिली.

माहिती मिळताच हितेश बनसोड यांनी सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर सावनेर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह गावकऱ्यांच्या मदतीने डोहात तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला.

यानंतर मृतदेह सावनेर येथील सरकारी रुग्णालयात आणण्यात आला. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून संबंधित व्यक्तीला मृत घोषित केले. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पुढील तपासणीसाठी मृतदेह नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हितज्योती आधार फाउंडेशनच्या ॲम्बुलन्सद्वारे पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, हा मृतदेह येथे कसा आला, हा अपघात आहे की अन्य काही कारण, याचा तपास सावनेर पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणाची व्यक्ती हरवली असेल तर तात्काळ सावनेर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button