citynewsLatest NewsMaharashtraWashim

लाखोंचा औषधसाठा धूळखात; कफ सिरप गायब, कारवाई मात्र शून्य?

वाशिम प्रतिनिधी :
वाशिम शहरातील एका पडीक सभागृहात लाखो रुपयांचा कफ सिरप आणि इतर औषधसाठा निष्काळजीपणे पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या साठ्यातील मोठ्या प्रमाणातील कफ सिरप चोरीला गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटना उघडकीस येऊन पाच दिवस उलटले असतानाही संबंधित दोषींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रुग्णांसाठी राखीव असलेली औषधे अशा प्रकारे धूळ खात पडून राहणे आणि त्यातून चोरी होण्याची शक्यता निर्माण होणे, ही गंभीर बाब मानली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून, शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. औषधसाठ्याची योग्य साठवणूक, देखरेख आणि वितरण याबाबत संबंधित यंत्रणांनी तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“रुग्णांच्या जीवाशी खेळ… जबाबदारांवर कारवाई कधी?”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button