AmravatiamravatinewsLatest NewsMaharashtra

बडनेरा : नववी वस्तीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजयंती उत्साहात साजरी

बडनेरा येथील नववी वस्ती परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांनी परिसर शिवमय झाला होता.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते हारार्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी नगरसेवक अजय जयस्वाल, किशोर जाधव, नगरसेविका रजनी डोंगरे तसेच मेघवानी यांनी उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले.

सेन्साई सोनल रंगारी यांच्या चमूने सादर केलेल्या शिवकालीन युद्धकलेच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. तलवारबाजी, दांडपट्टा आणि पारंपरिक युद्धकौशल्यांचे सादरीकरण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

जयंती उत्सव समितीच्या वतीने सहभागी खेळाडूंना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच सेन्साई सोनल रंगारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. शिस्त, उत्साह आणि शिवभक्तीने भारलेला हा सोहळा बडनेरकरांसाठी संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल मिलखे यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button