Amaravti GraminAmravatiLatest NewsMaharashtra

अमरावती जिल्ह्यातील रिक्त आधार नोंदणी केंद्रांसाठी “आपले सरकार सेवा केंद्र”साठी अर्जाचे आवाहन

अमरावती, ३० डिसेंबर २०२५:

जिल्ह्यातील रिक्त आधार नोंदणी केंद्रांचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती मार्फत करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्यता प्राप्त आणि सुरू असलेल्या “आपले सरकार सेवा केंद्र” चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ ते ०९ जानेवारी २०२६ ठेवण्यात आली आहे.

याअंतर्गत जिल्ह्यातील १८ नवीन आधार नोंदणी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. ही केंद्रे खालील ठिकाणी उभारली जाणार आहेत:

  • वलगांव, ता. अमरावती-१
  • आसरा, ता. भातकुली-१
  • मंगरूळ चव्हाळा, ता. नांदगाव खंडेश्वर-१
  • लोणी, ता. नांदगाव खंडेश्वर-१
  • घुईखेड, ता. चांदुर रेल्वे-१
  • जुना धामणगांव, ता. धामणगाव-१
  • वऱ्हा, ता. तिवसा-१
  • हिवरखेड, ता. मोर्शी-१
  • लोणी, ता. वरूड-१
  • पुसला, ता. वरूड-१
  • बेलोरा, ता. चांदुर बाजार-१
  • रासेगांव, ता. अचलपूर-१
  • वडनेर गंगाई, ता. दर्यापूर-१
  • भंडारज, ता. अंजनगांव सुर्जी-१
  • धुलघाट, ता. धारणी-१
  • हरिसाल, ता. धारणी-१
  • गौलखेडा, ता. चिखलदरा-१
  • टेंब्रुसोंडा, ता. चिखलदरा-१

जिल्हाधिकारी कार्यालयाने इच्छुक केंद्रधारकांनी वेळेत अर्ज करण्याचे विशेष निर्देश दिले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button