Latest NewsMaharashtraPune

शरद पवारांच्या विरोधात उद्धव ठाकरे; पुण्यात उबाठाची रणनीती ठरली, राष्ट्रवादीवर ‘15 दिवसांच्या घटस्फोटा’ची टीका

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (उबाठा) आता काँग्रेससोबत हातमिळवणी करत पुणे महापालिकेत जोरदार तयारी सुरू केली आहे. पुण्यात उबाठाची रणनीती स्पष्ट reducing असून राष्ट्रवादीच्या भूमिकेवर तीव्र टीका करण्यात आली आहे.

उबाठाचे नेते सहिन अहिर आणि काँग्रेस नेते सचिन अहिर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत पुणे महापालिकेतील आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट केली. यावेळी सतेज पाटील यांनी सांगितले की, “आमची राष्ट्रवादीसोबत दोन वेळा चर्चा झाली, मात्र कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आम्हाला उशीर झाला. मात्र यावेळी आम्ही पूर्णपणे दक्ष आहोत.”

महायुतीच्या कारभारावर जोरदार हल्ला

“गेल्या सात वर्षांतील महायुतीचा भ्रष्ट कारभार जनतेसमोर आहे. पुण्याची पाण्याची समस्या अद्याप सुटलेली नाही. मग सत्तेचा वापर जनतेसाठी झाला की स्वतःसाठी?” असा सवाल यावेळी सतेज पाटील यांनी उपस्थित केला.

जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

पुण्यात पहिल्या टप्प्यात

  • काँग्रेस : 60 जागांवर एबी फॉर्म
  • शिवसेना (उबाठा) : 45 जागांवर एबी फॉर्म

देण्यात येणार असून अंतिम यादी रात्री उशिरा जाहीर केली जाणार आहे.
मनसेकडून 32 जागांची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी 20 ते 21 जागांवर सहमती झाली असून उर्वरित 2-4 जागांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती सचिन अहिर यांनी दिली. घटक पक्षांशी चर्चा अद्याप सुरू असल्याचे सहिन अहिर यांनी स्पष्ट केले.

पालिका स्वायत्ततेचा मुद्दा केंद्रस्थानी

“महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. मात्र 29 ऑगस्ट रोजी कायदा करून पालिकेचे अधिकार जॉइंट डायरेक्टरकडे देण्यात आले. टाऊन प्लानिंगही त्यांच्याच हाती आहे. लोकशाही पालिकेत टिकली पाहिजे, हा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीत उतरणार आहोत,” असे सतेज पाटील म्हणाले.

सचिन अहिरांची राष्ट्रवादीवर आणि भाजपवर टीका

“पुणे-पिंपरीमध्ये विरोधकच ठेवायचे नाहीत, हे भाजपचे नियोजन आहे. महायुतीत ‘तुम्ही इकडे, आम्ही तिकडे’ अशी लढाई ठरलेली आहे. काहींना राजकीय आजार झाले असून ती त्यांची रणनीती आहे,” अशी टीका सचिन अहिर यांनी केली.

ते पुढे म्हणाले, “पुणे महापालिकेत बहुमत मिळाले नाही तर भाजपसोबत जाणार नाही, हे अजित पवारांनी जाहीर करावे. 15 दिवसांचा तात्पुरता घटस्फोट घ्यायचा, आम्ही बोलत नाही असे सांगायचे आणि पुन्हा एकत्र यायचे – हा प्रकार जनतेला आता कळू लागला आहे,” असा घणाघाती टोला त्यांनी राष्ट्रवादीवर लगावला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button