विद्यापीठाच्या हिवाळी-2025 लेखी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर, विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती (दि.08.12.2025) – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी – 2025 लेखी परीक्षेची वेळापत्रके विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहेत. सदर वेळापत्रकातील 19 व 20 डिसेंबर, 2025 पासून सुरू होणा-या परीक्षा तसेच बी.फार्म. आणि फार्म. डी. च्या 20 डिसेंबर, 22 डिसेंबर व 23 डिसेंबर रोजीच्या होणा-या परीक्षांची सुधारित वेळापत्रके जाहीर करण्यात आली असून विद्याथ्र्यांनी याची नोंद घ्यावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून कळविण्यात येत आहे.
यासंदर्भात सर्व प्राचार्य, केंद्राधिकारी, संबंधित महाविद्यालये, परीक्षा केंद्र यांना पत्राव्दारे परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले असून, संबंधितांनी याची सर्व विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षा विभागाच्या अधिका-यांच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.



