वाशीम जिल्ह्यातील शिवण गावातील रस्त्याचे काम ठप्प — ग्रामस्थांचा रोष, त्रिव आंदोलनाची चेतावणी

वाशीम | वाशीम जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या शिवण गावाचा महत्त्वाचा रस्ता गेल्या पाच वर्षांपासून नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेत आहे. वारंवार कामे होऊनही रस्ता सुटत नाही, उलट दर वर्षी पावसाळ्यात रस्त्याचे अस्तित्वच नाहीसे झाल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
शिवण गावातील नागरिकांच्या मते, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील या रस्त्यावर दोन ते तीन वेळा काम झाले, पण पहिल्याच पावसात रस्ता वाहून जातो. सततच्या तक्रारीनंतर या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत नव्याने मंजूर करण्यात आले. या कामाची जबाबदारी अमरावती येथील M/s G.H. Khandelwal कंपनीला देण्यात आली.
करारनाम्यानुसार
- काम सुरू: 15 मार्च 2024
- काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 14 सप्टेंबर 2025
मात्र अंतिम तारीख उलटूनही काम अद्याप अपूर्णच आहे.
प्रत्यक्ष स्थिती
- रस्त्यावर फक्त खडीकरण करण्यात आले
- तेही एक ते दीड वर्ष तसेच पडून ठेवले
- डांबरीकरण झालेले नाही
- खडीवर फक्त बारीक वाळू टाकून काम सुरू असल्याचे भासवण्यात आले
- वाळू वाहून गेल्याने खडी उघडी पडली
- रस्त्यावर मोठे खड्डे, धूळ, खडी — ये-जा करणे कठीण
- शाळकरी मुले, रुग्ण, शेतकरी यांना होत आहेत प्रचंड हालअपेष्टा
ग्रामस्थांत संताप, आंदोलनाची चेतावणी
कामात होत असलेल्या सततच्या दुर्लक्षामुळे आणि जबाबदार यंत्रणेकडून प्रतिसाद न मिळाल्याने शिवण गावातील नागरिकांनी त्रिव आंदोलनाची (रस्ता रोको – मोर्चा – प्रशासनाला निवेदन) चेतावणी दिली आहे.
ग्रामस्थांची मागणी स्पष्ट —
- रस्ता पूर्ण करा
- वचन पाळा
- कामात झालेल्या ढिलाईची चौकशी करा
स्थानिक प्रशासन व संबंधित विभागांनी याकडे तातडीने लक्ष देत रस्ता त्वरित पूर्ण करावा, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



