आत्मनिर्भर भारतासाठी ‘स्वदेशी जनजागृती रथ’ धामणगाव तहसीलमध्ये दाखल

धामणगाव रेल्वे : कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेने संपूर्ण देशभरात ‘स्वदेशी’ स्वीकारून भारताला आत्मनिर्भर (Aatmanirbhar Bharat) बनवण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘स्वदेशी जनजागृती रथाचे’ आज धामणगाव तहसीलमध्ये मोठ्या उत्साहात आगमन झाले.
गांधी चौकात रथयात्रेचे जोरदार स्वागत
स्थानीक गांधी चौकात या रथयात्रेचे आगमन होताच स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांनी जोरदार स्वागत केले. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाला डॉ. अर्चनाताई रोठे (अडसड), विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे, गिरीष मुंदडा, विदर्भ उपाध्यक्ष गिरीष भुतडा, तालुका अध्यक्ष संजय जांगडा, महिला विंग अध्यक्षा राधाजी भूत यांसह लक्ष्मीकांतजी वर्मा, प्रेमकुमार टावरी, अशोक भंडारी, मनोहर कांकरिया, प्रवीण बंब, सतीश कांकरिया, दीपक राठी, प्रशांत भंडारी, लाला मुंधडा, गोपाल भूत, दीपक केला, तरुण मुंधडा, संजय वर्मा, राजेश जांगडा यांसह मोठ्या संख्येने व्यापारी व पदाधिकारी उपस्थित होते.
वक्त्यांनी उपस्थितांना स्वदेशी वस्तूंचा प्रसार करून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. उपस्थितांनी यावेळी स्वदेशी उत्पादने वापरण्याचा व प्रोत्साहन देण्याचा संकल्प व्यक्त केला.
भगतसिंग चौकातही अभिवादन
या स्वदेशी जनजागृती रथाचे स्थानिक भगतसिंग चौकातही स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख चंद्रशेखर राठी, अशोक भंसाली, दर्शन राठी, बालू धुर्वे, शेखर पाटील तसेच CAIT चे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अमर शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून या स्वदेशी संकल्प रथयात्रेला अभिवादन करण्यात आले.
या रथयात्रेमुळे धामणगाव तहसीलच्या नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये स्वदेशी उत्पादनांच्या वापराविषयी आणि ‘लोकल फॉर व्होकल’ या संकल्पनेविषयी अधिक जागरूकता निर्माण झाली आहे.



