नागपुरात AHTU पथकाची धडक कारवाई; लाखोंचा अवैध दारूचा साठा जप्त, एक जण अटकेत

नागपूर: शनिवारी AHTU पथकाने नागपूर शहरातील कपिल नगर पोलीस ठाणे हद्दीत दारूबंदी कायद्यांतर्गत मोठी कारवाई करत लाखोंचा अवैध दारू साठा जप्त केला आहे. या प्रकरणात एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
शनिवारी झालेल्या या धडक कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(e)(a) अंतर्गत एक मोठी अवैध दारू वाहतूक प्रकरण उघडकीस आले. कारवाईदरम्यान अजय राधेश्याम जयसवाल (वय 47), रा. पारडी, नागपूर याला रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली.
पथकाने आरोपीच्या ताब्यातून विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. त्यामध्ये—
- एम्पिरियल ब्लू (180 ML) : 48 बाटल्या
- रॉयल स्टॅग (180 ML) : 48 बाटल्या
- रॉयल ग्रीन (180 ML) : 24 बाटल्या
- ओल्ड मॉंक (180 ML) : 24 बाटल्या
याशिवाय आरोपीकडून किया कंपनीची चारचाकी कार देखील जप्त करण्यात आली असून या वाहनाची अंदाजे किंमत 12 लाख रुपये आहे.
एकूण 12,33,720 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. जप्त केलेला संपूर्ण माल आणि संबंधित कागदपत्रे पुढील तपासासाठी कपिल नगर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.



