Crime NewsLatest NewsMaharashtraNagpur
नागपूरच्या सुरेंद्रगढ रोड परिसरात डॉक्टरांच्या घरात धक्कादायक चोरी

नागपूर – गिट्टीखदान पोलीस स्टेशन हद्दीतील सुरेंद्रगढ रोड परिसरात डॉक्टर सुरेंद्र कुमार सोनो यांच्या घरात धक्कादायक चोरीची घटना घडली आहे. डॉक्टर सोनो आणि त्यांचे कुटुंबीय नातेवाईकांच्या घरी संभाजीनगरला गेले होते, त्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून महागडे टीव्ही, नगदी आणि घरासमोरील दुचाकी चोरली.
ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. नागपूर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ज्या परिसरात ही चोरी घडली, त्या परिसरातील घरांच्या मालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी अधिक सुरक्षा उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असून नागरिकांना सांगितले आहे की, संशयास्पद व्यक्तींची माहिती त्वरित पोलीसांना द्यावी.



