AmravatiamravatinewscitynewsCrime NewsLatest News

चंदन नगर परिसरात असामाजिक तत्त्वांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीती

चंदन नगर परिसरात असामाजिक तत्त्वांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. २७ नोव्हेंबरला दुपारी चार वाजताच्या सुमारास झालेल्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघा युवक भरधाव दुचाकीवरून जाताना रमेश मोथे या नागरिकावर अचानक अकारण हल्ला करतात. मागे बसलेल्या युवकाने रमेश मोथे यांना लाथ मारल्याने ते जमिनीवर कोसळतात. घटनेनंतर हे तिन्ही युवक स्वतः रस्त्यावर कोसळले तरी कुठलीही मदत न करता, जबाबदारी न घेता तिथून पळ काढतात.

परिसरातील नागरिकांनी सांगितले की, असामाजिक तत्त्वांचा वावर इतका वाढला आहे की जेष्ठ नागरिक आणि महिलांना घराबाहेर सुरक्षित फिरणं कठीण झाले आहे.

इमामवाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button