City CrimecitynewsCrime NewsNagpurNagpur gramin

नागपूर : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला; आरोपीला ईमामवाडा पोलिसांची तात्काळ अटक

नागपूरच्या ईमामवाडा परिसरातून एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमाच्या अतिरेकातून जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला ईमामवाडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. या प्रकारामुळे नागपूर शहर हादरले असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.

घटना अशी घडली:
ईमामवाडा परिसरातील ३८ वर्षीय फिर्यादींच्या मुलीचा आरोपी सुरज कृष्णाप्रसाद शुक्ला काही दिवसांपासून वारंवार पाठलाग करत होता. यापूर्वीही त्याने मुलीचा विनयभंग करून “तू मला खूप आवडतेस” असे म्हणत अयोग्य वर्तन केले होते. मुलीने ही बाब कुटुंबीयांना सांगितल्यावर तिच्या वडिलांनी ही गोष्ट आरोपीच्या पालकांना कळवली. याचा राग मनात धरून सुरजने सूड घेण्याचा कट रचला.

हातोडा आणि चाकूने जीवघेणा हल्ला
१७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मुलगी नेहमीप्रमाणे कॉलेजकडे जात असताना आरोपीने अशोक चौकाजवळ तिला अडवले. त्यानंतर लोखंडी हातोड्याने डोक्यावर जोरदार वार केला, तसेच गळ्यावर आणि गालावर धारदार हत्याराने अनेक वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आरोपीला तत्काळ अटक
घटनेची माहिती मिळताच मुलीच्या वडिलांनी ईमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक काकडे यांनी आरोपीविरुद्ध कलम १०९, ७५, ७८ भा.न्या.सं. तसेच पोक्सो (POCSO) कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा नोंदवून सुरज शुक्लाला ताबडतोब अटक केली.

या घटनेचा पुढील तपास ईमामवाडा पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button