Latest NewsMaharashtra

किन्नर समाजातील दोन गटात तलवारबाज राडा

अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजापेठ बसस्टँडजवळील विनायक हॉल परिसरात बुधवार सकाळी ११ वाजताच्या सुमारास किन्नर समाजात मोठा वाद उफाळून आला. आम्रपाली श्यामराव चौधरी, वय ३२ वर्ष, व्यवसाय हातमजुरी, ही किन्नर महिला आपल्या सहकाऱ्यांसोबत राहत असून येल्लामा देवीचं मंदिर तेथे आहे. रोजप्रमाणे त्या सर्वजण भिक्षा मागण्यासाठी निघत असताना अचानक काही बाहेरगावचे किन्नर जोरात ढोल वाजवत भीक मागू लागले. यामुळे स्थानिक लोकांमध्ये तसेच किन्नरांमध्ये वाद निर्माण झाला. दरम्यान, साबनपुरा येथील ममता खान, अकबरनगर येथील हनी उर्फ फिरोज खान, आणि जुना बायपास येथील तन्नु इमरान या किन्नरांसह ८ ते १० साथीदारांनी गर्दी केली. भांडण इतकं वाढलं की ममता खान हिने तलवार काढून धमक्या दिल्याचा आरोप आम्रपाली चौधरीने केला आहे. तिच्या साथीदारांनाही हाता-बुक्यांनी आणि चापटांनी मारहाण करण्यात आल्याचं तिने सांगितलं आहे. स्थानिक नागरिकांच्या हस्तक्षेपानंतर आणि पोलिस येत असल्याची माहिती मिळताच आरोपी किन्नर गट ऑटो रिक्षामध्ये बसून घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी आम्रपाली चौधरी हिने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मारहाण, धमकी व गैरकायद्याची मंडळी जमविण्याचे गुन्हे नोंदविले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button