Latest NewsMaharashtra

श्री संकट मोचन विजय हनुमान मंदिरात छप्पन भोग उत्सव

अमरावतीतील श्री संकट मोचन विजय हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही छप्पन भोग उत्सवाचे आयोजन करण्यात आले. हा उत्सव महंत श्री मदन मोहनदासजी महात्यागी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मंदिरात गेली चाळीस वर्षे अखंड रामायण पठण सुरू आहे, हीच या ठिकाणाची खास परंपरा आहे. श्री हनुमान व महादेवाची भव्य आरती पार पडली. यानंतर भक्तांसाठी अन्नकुट महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले आणि ते मध्यरात्रीपर्यंत अखंडितपणे सुरू राहिले. या सोहळ्यात दीपक भाऊ नवाथे, डॉ. काळपांडे, गजानन पाठक, प्रेम जोड, पवन नवाथे, किशोर दोडे, आनंद कलंत्री, रमेशचंद्र सोनी, अशोक जाजू, महेंद्र गांधी, आनंद कडू, जेमंगेश मिटकरी, सूर्या इंगोले आणि आदित्य यांचा प्रमुख सहभाग होता.
तर कार्यक्रमास लोखंडे, दुर्गेश वलांडे, स्वस्तिक ठोसर, प्रशांत खोब्रागडे, हेमंत प्रजापती, निखिल वानखडे, हर्षद कुंदे, प्रेम अण्णा रतन बानेवार, भूषण ठाकरे, गजानन वानखडे आणि करण ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. या धार्मिक कार्यक्रमाला राज्यसभा खासदार डॉ. अनिलजी बोंडे, आमदार रविभाऊ राणा, आणि सुनील भाऊ राणा यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच ज्येष्ठ समाजसेवक लप्पी भैय्या जाजोदिया आणि कायदेतज्ज्ञ प्रशांत भाऊ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व्यवस्थापन आणि भक्तांच्या सोयीसाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजक म्हणून सुनील डुब्बरवार, अतुल भिलकर, पंकज शंकर, अंकुश पंचबुद्धे, शरद सोनकुसरे, अशोक यादव, मनोज पंकज जाधव आणि बाळासाहेब भरणे यांनी कार्यभार सांभाळला.
या सोहळ्याने अमरावतीतील भक्तांना पुन्हा एकदा श्रद्धेच्या वातावरणात एकत्र आणले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button