उज्जैन महाकालेश्वर मंदिरातुन भस्म आरतीचा अद्भुत सोहळा

मध्यप्रदेशातील प्राचीन नगरी उज्जैन – ज्याला शिवभक्तांसाठी कैलासाचं दुसरं रूप मानलं जातं. इथे वसलेलं महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थस्थानांपैकी अग्रस्थानी आहे. दररोज पहाटे घेतली जाणारी भस्म आरती — ही महाकालाची अनोखी परंपरा आहे. येथे पहाटे ४ वाजता घंटानादात आणि “हर हर महादेव” च्या जयघोषात आरतीचा प्रारंभ होतो. असं म्हणतात, ज्याला या आरतीचं दर्शन लाभतं, त्याच्या सर्व पापांचा नाश होतो आणि अकालमृत्यूचा भय संपतो. भाविक पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगेत उभे असतात.
महाकाल मंदिरात रोज भक्तांची गर्दी असते — महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि उत्तर भारतातून हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात.
अद्भुत गंध, भस्म, त्रिपुंड, रुद्राक्ष आणि बेलपानांच्या सुगंधात महाकालेश्वराचे वातावरण मंत्रमुग्ध करून टाकते.
भक्त म्हणतात — “महाकाल हाच अंतिम सत्य आहे, त्याचं स्मरण म्हणजेच मोक्षाचा मार्ग.”



