Latest NewsMaharashtra

राहेर येथे संत निवास भूमिपूजन सोहळा| कुंभमेळा 2028 ची तयारी सुरू

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील श्री क्षेत्र राहेर येथे आनंद देव दत्त श्री सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज यांच्या संत निवास भूमिपूजन सोहळ्याचा भव्य सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार नामदार अशोकराव चव्हाण, खासदार अजित गोपछडे, आमदार राजेश पवार यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा शुभारंभ साधुसंतांच्या उपस्थितीत प्रदीप प्रज्वलन करून करण्यात आला. त्यानंतर पूजा-अर्चा, आरती आणि संतांचे आशीर्वचन यांचा कार्यक्रम झाला. राहेर नगरीत 2028 मध्ये भव्य कुंभमेळा आयोजित केला जाणार असून या कुंभमेळ्यात देशभरातील नामवंत संत-महंत सहभागी होणार आहेत. यात बागेश्वर धामचे धीरेन्द्र शास्त्री बाबा, योगगुरू बाबा रामदेव, जगद्गुरु नरेंद्र महाराज आणि देशभरातील संतांची उपस्थिती अपेक्षित आहे. कार्यक्रमादरम्यान बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार अजित गोपछडे यांनी शासनाकडून या कुंभमेळ्यासाठी निधी मिळवण्याचं आश्वासन दिलं. राज्य शासन आणि केंद्र सरकारकडे निधी प्रस्ताव पाठवून राहेर कुंभमेळा भव्यदिव्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं. या सोहळ्यात साधुसंतांच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. धार्मिक भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button