विदर्भातील पहिली संविधान प्रतिकृती बडनेऱ्यात होणार साकार

बडनेरा येथील समता चौकातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सौंदर्यीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे.
सन 1918 मध्ये उभारण्यात आलेलं हे ऐतिहासिक स्मारक मागील 18 वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत होतं.
आता संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर स्मारक परिसरात संविधानाची प्रतिकृती उभारली जाणार आहे.
या प्रतिकृतीमुळे स्मारकाच्या सौंदर्यात “चार चांद” लागणार आहेत, असं स्मारक समितीने सांगितलं.
या कामासाठी आमदार रवी राणा यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक, सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि स्थानिक झोन क्रमांक चारचे अधिकारी यांचंही सहकार्य लाभत आहे.
स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजभिये आणि सचिव सिद्धार्थ बनसोड यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
स्मारकाच्या विकासासाठी सिटी न्यूजने दिलेल्या प्रसारामुळे प्रशासनालाही गती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.



