डॉ. संपदा मुंडे प्रकरणावरून यवतमाळमध्ये डॉक्टर संपावर

बीड येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी सेंट्रल मार्डच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा हे आंदोलन तीव्र होत असून, 150 निवासी आणि 200 आंतरवासिता डॉक्टरांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला आहे. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून, इतर सर्व विभागांमध्ये कामबंद आंदोलन राबवण्यात येत आहे. डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निषेध व्यक्त केला आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांना निवेदन सादर केलं. डॉक्टरांची मागणी आहे की डॉ. संपदा मुंडे प्रकरणातील आरोपींवर त्वरीत आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल



