बेघरांसोबत माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी साजरी केली दिवाळी

अमरावती – अमरावती महानगरपालिका आणि राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत ‘पब्लिक एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी’मार्फत चालविण्यात येणारे आधार शहरी बेघर निवारा केंद्र, बडनेरा येथे दिवाळीच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री. प्रवीण पोटे पाटील हे विशेष उपस्थित होते. त्यांनी येथील रहिवासी बेघर, निराधार, वृद्ध, अपंग आणि आंधळ्या व्यक्तींना दिवाळीची भेट दिली.
गेल्या तीन वर्षांपासून या केंद्रात राहत असलेल्या ७२ रहिवाशांना नवीन कपडे वाटप करण्यात आले. तसेच सर्वांना दिवाळीचा फराळ देण्यात आला आणि दीपावली निमित्त दोन दिवस पुरणपोळीचे जेवण दिले गेले. या प्रसंगी निवारा केंद्राचे संचालक राजीव बसवनाथे आणि व्यवस्थापिका ज्योती राठोड यांना
भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत
शाहू फुले आंबेडकर पारितोषिक मिळाल्याबद्दल माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी त्यांचा सन्मान केला.
कार्यक्रमाला माजी उपमहापौर चेतन पवार, माजी महापौर चेतन गावंडे,
तुषार भारतीय, शिवराय कुलकर्णी, जयंत डेहनकर, कटारिया,
सौ. सुरेखा लुंगारे, सौ. गंगाताई अंभोरे, तसेच
काळजीवाहक रोहित घोंगडे आणि किशोर मरकाम हे उपस्थित होते.
या उपक्रमात भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे दिवे प्रज्वलित करत “आधार” मधील या दिवाळीचा उत्सव साजरा केला.



