Latest NewsMaharashtra
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचं पॅकेज जाहीर – डॉ. अनिल बोंडे

महाराष्ट्रातील पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अखेर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे ऐतिहासिक पॅकेज जाहीर केले आहे,
या निर्णयामुळे राज्यातील तब्बल २५३ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वात खास बाब म्हणजे या मदतीसाठी कोणतेही निकष ठेवलेले नाहीत, म्हणजे प्रत्येक पुरग्रस्त शेतकरी या मदतीस पात्र ठरणार आहे. शेती उद्ध्वस्त झालेल्या, खारपड झालेल्या जमिनींसाठी, बागायती आणि हंगामी पिकांसाठी वेगवेगळ्या दराने आर्थिक मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या निर्णयाचं कृषी क्षेत्रात सर्वत्र स्वागत होतं आहे.



