कामरगाव तालुक्यात शेतकऱ्यांना फवारणी पंप वितरण

कामरगाव – वाशिम जिल्हा, शिवसेना शिंदे गट तर्फे खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर फवारणी पंपांचे वितरण सुरु झाले आहे. जिल्ह्याच्या कृषी विकासासाठी भावना गवळी नेहमीच सक्रिय आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक वस्तू व उपकरणे मिळवून देणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य भावात फवारणी पंप वाटप केले जात आहे.
या कार्यक्रमात तालुकाप्रमुख: मंगेश मुंदे, ज्येष्ठ मार्गदर्शक: सुरेश पाटील, ओबीसी सेल: दिलीप भाऊ भोजराज, अमोल भिंगारे, कारंजा शहर संघटक: ऍड. संदेश जिंतूरकर, युवासेना कारंजा मानोरा उपजिल्हा प्रमुख: चैतन्य वक्ते, युवा सेना कारंजा मानोरा विधानसभा प्रमुख: अजय मते, सर्कल प्रमुख: संदीप टेकाडे, विजय लांडकर, संदीप लाहे, शुभम भोयर आदीची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना फवारणी पंप मिळाल्यामुळे त्यांचे काम सोपे होईल आणि उच्च उत्पादनासाठी मदत होईल. भावनाताई गवळी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ओळखून त्यांच्यासाठी सतत उपाययोजना करत असल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी या पुढाकाराचे कौतुक केले आणि अशा कार्यक्रमांनी जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राचा विकास निश्चितच होईल असे मत व्यक्त केले.



