India NewsLatest News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीं आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना वाहिली आदरांजली

आज २ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी यांची जयंती देशभर मोठ्या आदराने साजरी होत आहे. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील राजघाट येथे महात्मा गांधींच्या समाधीवर जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

पंतप्रधान मोदींनी राजघाटावर पुष्पांजली अर्पण करून राष्ट्रपिता महात्मा गांधींना नमन केले. यावेळी उपराष्ट्रपती आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते.

याशिवाय, पंतप्रधान मोदींनी आज माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विजय घाट येथे जाऊन त्यांनाही आदरांजली वाहिली. देशभरात आज महात्मा गांधी यांची १५६ वी जयंती साजरी होत असून, संपूर्ण देश बापूंच्या सेवा आणि करुणा या मूल्यांचे स्मरण करत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button